कुरूळी येथे आरोग्य शिबिर संपन्न

0

चिंबळी : कुरूळी (ता.खेड) येथे सिसोदे हेल्थ केअर हॉस्पिटलच्या वतिने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा शुभारंम सरपंच चंद्रकांत बधाले यांच्या प्रमुख उपस्थित झाला. डॉ.यशराज मेटकर व डॉ सारिका पर्‍हाड, सिध्दी पर्‍हाड यांनी मुळव्याध, संधीवात, वजन कमी करणे व वाढविणे, डायबेटिस स्मरणशक्ती, व्यसनमुक्ती, मधुमेह, किडणी विकार आदि रोगांवर मोफत 200 रूग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. याप्रसंगी माजी सरपंच सुनदा बागडे ग्रा.पं सदस्य बाळासाहेब सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते.