कुर्‍हाड बु.॥ सरपंच अखेर अपात्र : अतिक्रमण भोवले 

Encroachment on government land: Kurhad Sarpanch finally disqualified पाचोरा : शासकीय जागेवर बेकायदा अतिक्रमण करून घराचे बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांनी पाचोरा तालुक्यातील कुर्‍हाड बु.॥ येथील ग्रामपंचायतीचे सरपंच उदयसिंग राठोड यांना सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरवल्याने खळबळ उडाली आहे.

सरपंचांना भोवले अतिक्रमण
कुर्‍हाड बु.॥, ता.पाचोरा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच उदयसिंग लखीचंद राठोड यांनी सरकारी गावठाण जागेवर अतिक्रमण करून घरकुलाचे बांधकाम केल्यामुळे त्यांना सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात यावे म्हणून राजू सखाराम राठोड व राजू भूरा राठोड यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर सखोल चौकशी होऊन शासकीय जागेवर बेकायदा अतिक्रमण करून इंदिरा आवास योजनेतुन राहते घराचे बांधकाम केल्याचे सिद्ध झाल्यामुळे, जळगाव जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी उदयसिंग राठोड यांना सरपंच व सदस्य पदावरुन नुकतेच अपात्र ठरविले. तक्रारदार राजू भूरा राठोड यांच्यावतीने अ‍ॅड. विश्वासराव भोसले (पिंपरखेड) यांनी काम पाहिले. निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागून होते.