Street lights worth 30,000 stolen from Kurha village : Kanaswadi trio arrested from video on social media भुसावळ : तालुक्यातील कुर्हा ग्रामपंचायतीचे 30 हजार रुपये किंमतीचे सौर उर्जेवरील पथदिवे व तीन बॅटर्या चोरी केल्याप्रकरणी तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पथदिवे बंद असल्याचे सांगत लांबवल्या बॅटर्या
मंगळवार, 6 रोजी सायंकाळी सात वाजता झालेल्या चोरी प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. कुर्हा ग्रामपंचायतीचे शिपाई संदीप रघुनाथ बारी (43) यांच्या फिर्यादीनुसार, कुर्हे गावातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ सौर उर्जेवरील पथदिवे लावण्यात आले होते व त्यासाठी तीन बॅटर्याही होत्या. मंगळवारी सायंकाळी सात वाजता संशयीत आरोपी सागर रामदास सोनवणे (26), दयानंद निवृत्ती कोळी (22) व चेतन गोकुळ सोनवणे (18, रा.कानसवाडी, जि.जळगाव) यांनी संधी साधून बॅटरी व लाईट लांबवले.
व्हिडिओवरून पटली आरोपींची ओळख
चोरी होत असताना तरुणाने हटकल्यानंतर आरोपींनी आम्ही ठेकेदाराची माणसे असून पथदिवे बंद असल्याने दुरुस्तीसाठी नेत असल्याची थाप मारली मात्र तरुणाने चोरी होत असताना व्हिडिओ बनवला होता व त्यातील फुटेजच्या आधारे आरोपींना तालुका पोलिसांनी पकडले. 1तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार युनूस शेख करीत आहेत.