कुर्‍हा येथील विवाहितेची आत्महत्या

भुसावळ  : तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावातील 26 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. सीमा गोकुळ पारधी (26, कुर्‍हा) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
विवाहिता पतीसह व सासुसह कुर्‍हे पानाचे येथे वास्तव्यास होत्या मात्र गुरुवारी रात्री 10 ते शुक्रवारी सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान केव्हातरी विवाहितेने गळफास घेतली. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना शहरातील रीदयम हॉस्पीटलमध्ये दाखल केले असता मयत घोषित करण्यात आले. तपास तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे करीत आहेत.