कुर्हा येथे ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला
लॉक न तुटल्याने मोठी आर्थिक हानी टळली : गस्त वाढवण्याची अपेक्षा
मुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्हा गावातील जळगाव ज्वेलर्स दुकान फोडण्याचा प्रयत्न झाल्याने गावातील व्यापार्यांमध्ये भीती पसरली आहे. चोरट्यांनी दुकानाची एक कडी तोडली मात्र दुसरे लॉक न तुटल्याने चोरीचा प्रयत्न फसल्याने मोठी अप्रिय घटना टळली.
पोलिसांनी घेतली धाव
बुधवारी सकाळी बालाजी कॉम्प्लेक्समधील दीपक नंदलाल सोनी हे आपले सोन्या-चांदीचे जळगाव ज्वेलर्स दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचा एक बाजूचा कडी-कोयंडा तुलेला व मध्यभागी असलेला लॉक तोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे समजताच दीपक सोनी यांनी आजूबाजूला असलेल्या दीपक कुमट, माजी सरपंच प्रकाश चौधरी, पत्रकार नितीन कासार पत्रकार यांना माहिती कळवली. पोलिसांना माहिती कळताच सहा.फौजदार माणिक निकम, गोपीचंद सोनवणे, संजय लाटे, पोलीस कॉन्स्टेबल सागर साबे यांनी धाव घेतली. पोलिसांसमक्ष दुकान उघडल्यानंतर त्यातील माल पूर्णपणे सुरक्षित असल्याचे दिसून आले.
सीसीटीव्हीत चोरटे कैद
सराफा दुकानातील व बालाजी कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर स्कॉर्पिओ वाहनातून तीन चोर उतरल्यानंतर त्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी आता वाहनाच्या क्रमांकासह चोरट्यांच्या छबीवरून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, परीसरात एकाच महिन्यात तिसर्यांदा चोरीचा प्रकार घडल्याने व्यापारी धास्तावले आहेत. यापूर्वी दिनेश जैस्वाल यांच्या अंबिका ट्रेडिंग या धान्य दुकानातून 43 हजार तर सुमित चौधरी यांच्या कपाशीच्या दुकानातून एक लाख 55 हजारांची रोकड लांबवण्यात आली होती. महिना उलटूनही चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही त्यामुळे व्यापार्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने दुकाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही रात्र गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.