अॅट्रासिटीनुसार गुन्हा दाखल : दोन जणांना अटक
मुक्ताईनगर : तालुक्यातील कुर्हा येथे दूध विक्रेत्यास रस्ता अडवून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना 2 एप्रिल रोजी सायकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात पिडीत व्यक्तीच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोन जणांना अटक करण्यात आली आहे .
चौघांविरुद्ध गुन्हा : दोघांना अटक
तालुक्यातील कुर्हा येथे विलास महाजन यांच्या घरी दूध घेऊन जाणार्या ज्ञानेश्वर मनोहर तांबे (35 ,रा.कुर्हा) यांचा अजबराव देवधुत पाटील व कुटुंबातील इतर तीन सदस्यांनी रस्ता अडविला व लोखंडी पाईप, पहार ने मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना 2 एप्रिल रोजी सायं 5 वाजेच्या सुमारास घडली होती. दरम्यान याप्रकरणी ज्ञानेश्वर मनोहर तांबे यांच्या फिर्यादीवरून 3 एप्रिल रोजी अजबराव देवधुत पाटील (64), शिवाजी अजबराव पाटील, संतोष अजबराव पाटील व नंदाबाई अजबराव पाटील अशा चौघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अजबराव पाटील व शिवाजी पाटील यांना अटक करण्यात आली आहे .