कुर्‍हेजवळ टवेरा-ट्रकचा अपघात ; दोन जण जखमी

0

पहाटेची घटना ; जखमींवर गोदावरीत उपचार

भुसावळ- भरधाव ट्रक व टवेरा वाहनात अपघात होवून दोन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावाजवळील सुशीला जिनींगजवळ घडली. जामनेरकडून भरधाव वेगात येणारी टवेरा व भुसावळकडून जामनेरकडे जाणारा ट्रक यांच्यात समोरा-समोर धडक होवून टवेरा चालक संदीप गुलाब राजपूत (19, सुलतानपूर) व संजीव सिन्हा (40, भुसावळ) या जखमी झाल्या. अपघाताची माहिती कळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण हजारे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गोदावरील हलवले. या प्रकरणी अद्याप अपघाताची नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.