भुसावळ– तालुक्यातील कुर्हेपानाचे येथील तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. वेल्डिंग वर्कशॉप चालक दिलीप शांताराम शिंदे (वय 22, रा. रेणुका नगर) याने संशयित भाऊलाल देवराम भोई, लहू भाऊलाल भोई व आकोश भाऊलाल भोई यांच्या नवीन घराच्या लोखंडी खिडक्या तयार करण्याचे काम घेतल्यानंतर ते वेळेत पूर्ण न केल्याने संशयितांनी दिलीप यास शिवीगाळ, मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत अॅडव्हान्सपोटी दिलेले पैसे परत घेतले होते. यामुळेच दिलीपने अपमानास्पद वाटून आत्महत्या केल्याचा आरोप करीत दिलीपचा भाऊ कृष्णा शिंदे याने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.