भुसावळ : उसनवारीचे एक हजार रुपये न दिल्याने तालुक्यातील कुर्हेपानाचे येथे एकावर लोखंडी पट्टीने हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात शरद पाटील (45) जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारार्थ हलवण्यात आले. या प्रकरणी रात्री उशिरा भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी अमोल उर्फ करण अर्जुन बावस्कर (22) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येवून त्यास अटक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली.