कुर्‍हे परीसरात आठवड्यात दुसरी चोरी

0
भुसावळ :- तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी लक्ष केद्रीत केले असून कुर्‍हा येथील रेणूका डेअरीतील 38 हजार रूपये लांबवलीत. विशेष चोरट्यांनी अन्य दुकानेही फोडली, तेथे त्यांना काहीही मिळाले नाही. तसेच गोजोरे ग्रा.पं.ही कुलूप चोरट्यांनी तोडले, यामुळे ग्रामीण भागात चोरट्यांची भिती निर्माण झाली आहे. चोरट्यांनी विशेष करून कुर्‍हा पानाचे येथे मुक्काम ठोकला आहे. एकाच आठवड्यात दुसर्‍यांदा तेथे चोरी झाली आहे.
कुर्‍हा पानाचे येथे गेल्या महिन्यापासून चोरट्यांनी धूमाकूळ घातला आहे. गेल्याच आठवड्यात कुर्‍हा पानाचे येथे केदारनाथ नगर मध्ये बिर्‍हाडे यांच्याकडे चोरट्यांनी चोरी करून घरातील 1 लाख 8 हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिणे लांबवले होते. त्या घटनेचा तपास अद्यापही काहीही लागला नसतांनाच पुन्हा चार ठीकाणी चोरट्यांनी दुकाने फोडली मात्र फक्त रेणूका डेअरीतच चोरट्यांना 38 हजार रूपये मिळाले. सकाळी डेअरीतून 1 लाख 42 हजार रूपयांची चोरी झाल्याचे पोलिसांना तोंडी तक्रारीत व्यवस्थापक यांनी सांगितले मात्र नंतर कपाटाच्या बाजूलाच पैश्यांचे बंडल पडले असल्याने डेअरीतून फक्त 38 हजार रूपयांची चोरी झाल्याचे त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. वारंवार होणार्‍या चोर्‍यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.