भुसावळ । तालुक्यातील कुर्हे प्र.न. येथील शिवाजी विकास सोसायटी पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी होवून पुन्हा सत्ता काबीज केली. पॅनलचे नेतृत्व माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील, सरपंच अण्णा शिंदे, माजी उपसरपंच रविंद्र बारी, माजी ग्रामपंचायत सदस्य अविनाश बावस्कर, जितेंद्र नागपूरे यांनी केले.
या निवडणुकीत माजी पंचायत समिती सदस्य नाना पाटील, जनार्दन गांधेले, माजी चेअरमन जगन पाटील, सुभाष काळे, माजी जिल्हा परिषद सदस्या शशिकला बडगुजर, रामदास बारी यांसह अनेक दिग्गज पराभूत झाले.
निवडून आलेले उमेदवार
सर्वसाधारण गट – राजेंद्र पाटील, राजेश जोशी, सुधाकर पाटील, भरत बारी, अरुण कोळी, सुभाष शिंदे, दिलीप महाजन, संतोष बावस्कर, महिला राखीव गटात सुमन पाटील, मंगला बारी, इतर मागासवर्गात विलास चौधरी, अनुसुचित जातीत नामदेव सपकाळे, भटके विमुक्त वर्गात संजीव धनगर हे विजयी झाले.