कुर्‍हे शिवारात गुराख्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू

0

शेततळ्यातून गुरांना बाहेर काढताना दुर्घटना ः नगाव गावावर शोककळा

अमळनेर- तालुक्यातील कुर्‍हे खुर्द शिवारात रस्त्यालगत असलेल्या शेततळ्यात बुडून गुराख्याचा मृत्यू झाल्याची घअना सोमवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. शांताराम गिरधर पाटील (55, नगाव) असे मृत गुराख्याचे नाव आहे. ते नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी कुर्‍हे खुर्द शिवारात गेले असता सर्वात मोठ्या असलेल्या शेततळ्यात गुरे उतरली. या गुरांना शेततळ्यातून बाहेर काढण्यासाठी ते तळ्यात उतरले मात्र यावेळी ते खोल खड्ड्यात पाय गेल्याने बुडाले. ही घटना एकाने पाहून आरडा-ओरड करून जमाव जमवला मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.