कुर्‍ह्याचे सेवानिवृत्त मंडळाधिकारी ‘अपसंपदेचे धनी’

0

एसीबीच्या चौकशीत सापडले आठ लाखांचे घबाड

भुसावळ – सेवानिवृत्त मंडळाधिकारी सुधाकर खर्चे अपसंपदेचे धनी ठरले असून जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या चौकशीत त्यांच्याकडे तब्बल आठ लाख रुपये किंमतीची भ्रष्ट मार्गाने पदाचा गैरवापर करून मिळवलेली अपसंपदा आढळल्याने त्यांच्यासह त्यांच्या पत्नी मालती खर्चे यांच्याविरूध्द एसीबीच्या पोलीस निरीक्षक नीता कायटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर करीत आहे.