मुक्ताईनगर- तालुक्यातील कुर्हा येथे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी लाकडी कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड मिळून 70 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कुर्हा येथील रहिवासी प्रभूसिंग शिवसिंग बडुगे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 15 हजारांची रोकड तसेच 750 ग्रॅम वजनाचे चांदीचे कडे तसेच सात ग्रॅम सोन्याची अंगठी मिळून 69 हजार 500 रुपयांचा ऐवज लांबवला. शुक्रवारी पहाटे चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक संदीप खंडारे करीत आहेत.