ठाणे : कॉलसेंटर, ओलाकेब आणि टेक्सी याना हेरून माजिवडा परिसरात रात्रीच्या वेळेस चाकूचा धाक दाखवून लुटण्याच्या प्रकाराने कारचालक आणि कापूरबावडी पोलिसांच्या डोक्याला ताप ठरला होता. कापूरबवाडीत रोज कारचालक आणि ओला,प्रवासी वाहवून नेणाऱ्या कार चालकाना चाकूच्या धाकावर लुटण्याच्या प्रकरण आला घालण्यासाठी कापूरबावडी पोलिसांनी पळत ठेवून वाहनचालकांना लुटणाऱ्या चौघा आरोपीना अटक केली. यात दोन सराईत गुन्हेगार आहेत तर दोन आरोपी हे कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अटक आरोपी अक्षय उर्फ चिन्मय राजेश उगवेकर(२३) रा. दशरथ पाटील चाळ, बाळकूमपाडा ठाणे, विशाल महेशप्रसाद सरोज उर्फ मोनू(२१)नागसेननगर, खारटन रोड ठाणे, अर्जुन रविशंकर तिवारी(२०) रा. लक्ष्मीनगर बाळकुमपाडा नं १ ठाणे हा मुलाचा यूपीतील वाराणसी परिसरातील आहे. आरोपी राजकुमार ल्पभाजी डोळे (१९) रा. बायर इंडियाच्या गेट नं २ समोर रॅम मारुती नगर, बाळकूम ठाणे यांचा समावेश आहे. पोलीस पथकाने या आरोपींच्या अंगझडतीत चोरीचे ९ मोबाईल, एक टेब्लेट, दोन कारटेप आणि दातेरी सूरा असा ४४ हजाराचा माळ सापडला. तर आरोपित विशाल उर्फ मोनू यांनी चोरलेली ६ लाखाची हुंदाई असेन्ट मॉडेल ६ लाखाची गाडी हि हस्तगत करण्यात आली. आता पर्यंत अनेक कॅब चालकांना चाकूचा धाक दाखवून लुटत असे परंतु मोठा हात मारण्याच्या उद्देशाने गाडीच लंपास करण्याचा कट रचला त्यासाठी त्यांनी चालकाला संपविण्याचा प्रयत्न केला. या चौघांनी कॅब चालक विमालेश गुप्ता याला सोडण्यासाठी सांगितले आणि छोटी मोठी चोरी सोडून मोठी चोरी करण्याच्या उद्देशाने चौघांनी त्याला मारून गाडी लंपास करण्याचा कट रचला आणि नाशिक रोडवर एका अज्ञात स्थळी गाडी थांबवून त्याच्या डोक्यावर चाकूने वार केला आणि त्याला मयत झाल्याचे समजून तिथेच फेकून दिले.
पायी शिर्डीला जात असलेल्या साई भक्तांनी त्या वाहन चालकाला पोलिसांच्या मदतीने इस्पितळात भरती केले. फिर्यादी ने दिलेल्या जबानी आणि आरोपीच्या वर्णनावरून पोलिसांनी या चौघांचा शोध घेण्यास कंबर कसली आणि या चौघांना अटक केली. अटक केलेले चार आरोपी पैकी २ आरोपी हे गुन्हेगारी क्षेत्रातले असून इतर २ जन कॉलेज विद्यार्थी आहेत. मुख्य आरोपी अक्षय उगवेकर हा अकोल्याचा असून याने हि टोळी तयार केली होती अक्षय वर आधीही गुन्हे दाखल असून अजून गुन्हे त्याच्या कडून उघड होण्याची शक्यात आहे. न्यायालयाने त्या चौघांना ४ दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. परंतु अजून गुन्हे या चौघांकडून उघड होण्याची शक्यता असल्याने पोलीस त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करणार असल्याचे सांगितले.