कुलगाम: जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले आहे. कुलगाम जिल्ह्यातील ताझीपोरा गावात दहशतवादी लपून बसले होते. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रीय रायफल्स, राज्य पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप आणि सीआरपीएफने परिसराला घेराव घालत शोध मोहीम सुरु केली.
दहशतवादी लपले होते त्या घराजवळ सुरक्षा दल पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला ज्यानंतर चकमक सुरु झाली. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव कुलगाम जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यादरम्यान जम्मूमध्ये दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. लष्कर तळाचे फोटो आणि व्हिडीओ काढत असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. दोघांना पोलिसांकडे सोपवण्यात आलं असून चौकशी सुरु आहे.