कुलगाममध्ये तीन दहशतदवाद्यांचा खात्मा

0

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाम भागात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात तीन दहशतदवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. यात तीन जवान जखमी झाले झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीर पोलीस व लष्करी जवानांचे संयुक्त पथकाकडून ही कारवाई केली जात आहे.

ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला आहे. उत्तर काश्मीर जिल्ह्यातील कुपवाडामधील केरन सेक्टमध्ये काल घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत, जवानांनी एक दहशतवाद्याचा खात्मा केला होता. या दहशतवाद्याकडून एक एके 47 रायफल हस्तगत करण्यात आली होती. तसेच, परिसरात आणखी दहशतवादी असल्याचा संशय असल्याने जवानांकडून संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.