अमळनेर । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.पी.पाटील यांनी अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरास भेट दिली. त्यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली. डॉ. पाटील यांच्यासमवेत निवृत्त प्राचार्य तथा प्रताप तत्वज्ञान केंद्राचे मानद सचिव डॉ. एस.आर.चौधरी, कार्यध्यक्ष प्रा.सुधीर पाटील, ’ उमवि ’ चे परीक्षा नियंत्रक डॉ. डी. एन. गुजराथी , गोकुळ पाटील, प्रा. डॉ.जयेश गुजराथी , प्रा.धिरज वैष्णव होते.मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाद्यक्ष एस.एन. पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त दिलीप बहिरम यांनी केले त्यांचे स्वागत केले. कुलगरुंनी मंदिर परिसर व उपक्रमांचे कौतुक केले.