कुलगुरु डॉ. पी.पी. पाटील यांच्याहस्ते पुस्तकाचे प्रकाशन

0

जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. तुकाराम दौड लिखीत हिंदी पत्रकारिता और सूचना प्रौद्योगिकी या पुस्तकाचे प्रकाशन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.पी. पाटील यांच्याहस्ते आज थाटात पार पडले. प्रकाशन सोहळ्याला डॉ.दौड यांच्यासह सामाजिकशास्त्रे प्रशाळाच्या संचालिका डॉ.अर्चना देवगांवकर , सहायक प्राध्यापक डॉ. सुधीर भटकर, जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील, युवराज परदेशी, नारायण परदेशी उपस्थित होते.

हिन्दी पत्रकारितेची बदलते स्वरूप सखोल संशोधन
पत्रकारिता अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार्‍या पुस्तकात इंटरनेट हिन्दी पत्रकारितेची बदलते स्वरूप, वेब पत्रकारिता, हिन्दी ब्लॉगिंग, अन्तरराष्ट्रीय मीडिया, हिंन्दी वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप, हिन्दी भाषेच्या विकासात मराठी भाषिक पत्रकारांचे योगदान, शेतकरी आत्महत्या व मीडिया आदि विषयांवर संशोधन करण्यात आले. पुस्तकाचे प्रकाशन कानपूर येथील शैलेजा प्रकाशनतर्फे करण्यात आले आहे. हिन्दी पत्रकारितेचे स्वरूप तसेच या क्षेत्रातील स्थिती व आव्हाने या संबंधीत माहिती मिळेल असा विश्वास डॉ. दौड यांनी व्यक्त केला आहे.

डॉ दौड यांचा परिचय
12 वर्षापासून विविध माध्यम संस्थातून कार्यरत ,याअगोदर पर्यावरण सवांद पुस्तक प्रकाशित आहेत .50 पेक्ष्या जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुस्तकात शोध निबंध,लेख प्रकाशित.मराठी,हिंदी,व इंग्रजी भाषेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मासिके व वृत्तपत्रात लेख प्रसिद्ध आहेत.या पुस्तकाच्या माध्यमातून प्रिन्ट व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांसह देशभरातील विविध विद्यापीठामध्ये हिन्दी पत्रकारिता या क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍या तरूणांना फायद्याचे ठरणार आहे.