कुलगुरु पी.पी.पाटील यांचा मू.जे.महाविद्यालयातर्फे हृदयसत्कार

0

जळगाव : सत्कार स्वीकारतांना मन भरून आले असल्याची भावना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पी.पी. पाटील यांनी व्यक्त केली. ते खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित सत्कार व गौरव प्रसंगी केले. त्यांचा गौरव खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. के.बी. पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर यांच्या सोबत व्यवस्थापन सदस्य उपस्थित होते.

विद्यापीठाचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी प्रयत्न करणार; 28 वर्षांपूर्वींचा काळ आठवत असल्याची भावना
प्रा. डॉ. पाटील यांनी पुढे सांगितले की, सत्कार स्वीकारतांना 28 वर्षांपूर्वींचा काळ आठवत असल्याचा सांगितले. पुणे येथे पी.एचडी. केल्यानंतर जाणीवपूर्वक खान्देशात परतलो असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केेले. माझ्या मातीला माझ्या उच्च शिक्षणाचा फायदा व्हावा यासाठी परत आले असल्याचे म्हटले. मूळजी जेठा महाविद्यालयाने प्रथम संधी दिली. मूळजी जेठा महाविद्यालयाच्या तीन वर्षांच्या काळात चांगले अनुभव मिळाले. याकाळात व्यवस्थापनाने दिलेल्या कामाच्या मोकळीमुळेच कामाचा ठसा उमटविता आल्याची भावना व्यक्त केली. डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध योजना आखल्या असल्याचे सांगितले. विद्यापीठाच्या अखत्यारीतील दहा टक्के महाविद्यालये ऑटोनॉमस करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहे. यामध्ये मु.जे. महाविद्यालय ऑटोनॉमस व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाचा कारभार पारदर्शक व्हावा तसेच रोजगारपुरक, संस्थाचालक कर्मचारी विद्यापीठ यांच्यात समन्वय असावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नंदकुमार बेंडाळे, प्रा. डॉ. आर.एस.माळी, भरत अमळकर, माजी प्राचार्य डी.एस.नेमाडे आपले मनोगत व्यक्त केले. माजी प्राचार्य अनिल राव यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्राचार्य उदय कुलकर्णी यांनी मानले. सूत्रसंचलन भाग्यश्री भलवतकर यांनी केले.