कुलदिपक विद्यालयात महिला दिन साजरा

0

नंदुरबार । कुलदिपक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय झामणझर (ता.नवापूर) येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून विद्यालयातील शिक्षिका प्रमीला मावची ह्या होत्या. तर अध्यक्षस्थानी वरिष्ठ शिक्षक ए. एस. भोई होते. पाहूण्या प्रमीला मावची यांनी महिलांचे समाजातील स्थान, सद्यस्थिती व शैक्षणिक उन्नती या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ए. एस. भोई यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थिनींनी चांगले शिक्षण घेऊन समाजात नाव लौकिक वाढवावा व सर्व क्षेत्रात प्राधान्य मिळवावे. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक डी.बी.वाघ यांच्या अनुमतीने करण्यात आले. सुत्रसंचालन एस.व्ही.बेहेरे यांनी तर आभार पी. एम. नवरे यांनी मानले.