कानपूर । चकेरी एरिया मधील फ्लॅट मध्ये राहत असलेले रामसिंह यादव संपुर्ण घर शनिवारची रात्री जागुन काढली. काय होणार आपल्या मुलाचे व तो धर्मशाळा येथे खेळणार की नाही? याच विचारात सकाळी लवकर उठले.सामना सुरू होण्याच्या वेळेला टिव्ही लावला.
तेव्हा माहिती झाले की कुलदिप यादव याच समावेश 11 खेळाडूमध्ये झाला आहे.मुलाने पहिल्या कसोटीत पहिला फलंदाज बाद केला त्यावेळी आई वडील व बहिणाला विश्वास झाला नाही. त्यानंतर डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि एक दुसर्यांना मिठाई भरवू लागले.