फैजपूर। निरपराध भारतीय नागरीक कुलभुषण जाधव यांना पाकिस्तानने इराणमधून अपहरण करुन भारतीय गुप्तहेर ठरवित न्यायालयीन प्रक्रिया निपक्षपणे न राबविता फाशीची शिक्षा जाहिर केली आहे. या घटनेचा जाहिर निषेध म्हणून शांततेच्या मार्गाने प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यात आले. विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करुन कुलभुषण जाधव यांच्या समर्थनार्थ त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारला निवेदन पाठविले आहे.
या निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुषमा स्वराज व गृहमंत्री राजनाथसिंह यांना पाठविण्यात आली. याप्रसंगी अनिरुध्द सरोदे, बजरंग दलाचे अध्यक्ष प्रा. जी.के. महाजन, प्रभारी नगराध्यक्ष हेमराज चौधरी, भाजपा अध्यक्ष संजय रल, संजय सराफ, तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, अनिता नेहेते, देवा चौधरी, मनोज चौधरी, विक्की जैसवाल, शाकिर मलक, सादिक शेख, मनोज कापडे, पप्पू जाधव आदी उपस्थित होते.