कुलूप तोडून घेवून गेला भांडे अन् कपडे!

0

जळगाव। शिवाजी नगरात मातेफिरू मद्यपीने एका महिलेच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून भांडे व कपाटातून कपडे काढून घेवून जात गोंधळ घातल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. महिलेच्या मुलीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्या मद्यपी तरूणास ताब्यात घेतले आहे. यापूर्वी देखील या मद्यपी तरूणान रहिवाश्यांचे नळ, टाक्या, मोटारसायकची टाकी तोडल्याने नागरिकांनी जानेवारी महिन्यात तकार केली होती. हेच नव्हे तर त्याला शिवीगाळ का केली याचा जाब विचाणार्‍यासही तो दगड फिरकावून मारत असल्याचे रहिवाश्यांनी सांगितले. तरूणाच्या या वागण्यामुळे गल्लीतील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

शिवाजीनगरातील एकबोटे वाड्यात प्रशांत पद्माकर एकबोटे हा तरूण आई-वडीलांसोबत राहतो. मात्र, दारूचे वेसन असल्यामुळे तो नेहमीच आई-वडीलांना मारहाण करतो. याबरोबर दारू पिऊन आल्यानंतर रस्त्यावर लोकांना शिवीगाळ करून त्यास जाब विचारणार्‍यास मारहाण करत असल्याने एकबोटे वाड्यातील रहिवासी त्याच्या या त्रासापासून त्रस्त झाले आहेत. आज मंगळवारी पुन्हा त्याने वाड्यात राहणार्‍या विमल अर्जुंन आहेर ही महिला घरी नसतांना तिच्या घराचा दरवाज्याचा कुलूप तोडून घरात प्रवेश करून सात ते आठ भांडे व कपाटातील कपडे घेवून निघून गेला. हा प्रकार प्रशांत याच्या आईच्या लक्षात येताच त्यांनी विमलबाई यांना मुलाने केलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. विमलबाई यांनी लागलीच मुलगी पुनम गायकवाड ही घटना सांगता. पुनम हिने लागलीच शहर पोलिस ठाण्यात मद्यपी तरूणाने घरातील सामान घेवून गेल्याचे सांगताच शहर पोलिसांनी शिवाजीनगर गाठत प्रशांत एकबोट या दारूड्यास घरातून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आहेर कुटूंबिय घर खाली करत नसल्याने मी तसे केल्याचे पोलिंना सांगितले. मात्र, यापूर्वी देखील वाड्यातीलच रहिवाश्यांचे मद्यपीने नळ, टाक्या तोडल्याचे पुनम गायकवाड यांनी सांगितले. एकाच्या मोटारसायकलीची टाकीही दगड टाकून फोडल्याचे तिने सांगितले.

जाब विचारणार्‍यास मारहाण
मद्यपी प्रशांत एकबोटे हा दारूच्या नशेत ये-जा करणार्‍यांना शिवीगाळ करतो. शिवीगाळ का करतो असे विचारणार्‍यास तो दगड मारून फेकता नाही तर काही तरी नुकसान करतो, असे रहिवाश्यांचे म्हणणे होते. अनेक वेळा तरूण हा रस्त्यावरच नग्न अवस्थेत फिरत असल्याने नागरिकांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यातही तक्रारी केल्या होत्या. मात्र, मंगळवारी चक्क घरात कुणी नसतांना कुलूप तोडून भांडे व कपडे घेवून जाण्याचा प्रकार त्याने आज घडविला. त्यानंतर प्रशांत आहेर याने शहर पोलिस ठाण्यात कारवाईसाठी तक्रारी अर्ज दाखल केला आहे.

मद्यपी प्रशांत याने यापूर्वी देखील वाड्यातील लोकांचे घराचे नळ व टाक्या तोडले आहेत. तर नळ, टाक्या तोडल्याचा जाब विचारणार्‍या लोकांना प्रशांतने मारहाण केली आहे. प्रशांतच्या त्रासाला कंटाळून अखेर जानेवारी महिन्याव एकबोटे वाड्यातील महिलांनी शहर पोलिस ठाण्यात त्याच्याविरूध्द तक्रारी अर्ज केला होता. त्याच्या आई ही नगरपालिकेत शिपाई ह्या पदावर असून तिला देखील तो दारूसाठी पैसे मागतो, पैसे न दिल्यास आईलाच मारहाण करत असल्याचे अर्जात म्हटले होते. यातच प्रशांत अर्जुंन आहेर यांच्या एमएच.19.सीए.4692 या दुचाकीची टाकी दगड टाकून फोडले होते.