रावेर : कवितेतून संस्कृतीची जपवणुक होते. महिलेने गायलेल्या ओव्या या मुलांवर चांगले संस्कार घडवू शकतात यातुनच एक महिला त्या कुळाची उद्धारक ठरू शकते, असे मनोगत कवी प्रा. वा.ना. आंधळे यांनी रावेर येथे केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रावेर तालुका खान्देश माळी महासंघातर्फे ‘आई मला जन्म घेऊ दे’ या विषयावर प्रा. आंधळे यांचे व्याख्यान व सावित्रीच्या लेकी हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा सपंन्न झाला.
उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा गौरव
याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावून कार्य करणार्या महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच महिलांनादेखील समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा व पर्यायाने समाजाचा विकास साधण्याच्या दृष्टीने परिसरातील पाच महिलांना रावेर तालुका खान्देश माळी महासंघातर्फे ‘सावित्रीच्या लेकी’ हा जीवन गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. यात कुसुंबा येथील मुख्याध्यापिका ज्योती अंतुर्लीकर, नगरसेविका पार्वती शिंदे, रसलपुर येथील सरपंच कोकीळा वानखेडे, ऐनपुर येथील आरोग्य सहाय्यिका पद्मा नेमाडे, सामाजीक कार्यकर्त्या सुनिता डेरेकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या निमित्ताने प्रा. वा.ना. आंधळे यांचे ‘आई मला जन्म घेऊ दे’ या विषयावर व्याख्यान झाले.
यांनी घेेतले परिश्रम
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांतीलाल महाजन, रामकृष्ण महाजन, युवाध्यक्ष प्रकाश महाजन, गणेश फुलमाळी, नितीन महाजन, दिनेश महाजन, अतुल महाजन, एस.के. महाजन, संदिप महाजन, रंभाबाई महाजन, पुष्पा महाजन, भारती महाजन, छाया महाजन, सुनिता महाजन, प्रमीला महाजन आदींनी परीश्रम घेतले. संचालन आकाश महाजन यांनी तर आभार तालुकाध्यक्ष पिंटु महाजन यांनी मानले.
यांची होती उपस्थिती
येथील माळी समाज नियोजित मंगल कार्यालयाचे प्रागंणावर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश माळी महासंघाच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षा शंकुतला महाजन या होत्या. प्रमुख अतिथी म्हणुन नगराध्यक्ष दारा मोहंमद, उपनगराध्यक्ष सुधीर पाटील, नगरसेवक अॅड. योगेश गजरे, नगरसेविका संगिता महाजन, शारदा चौधरी, महासंघाचे पदाधिकारी मुरलीधर महाजन, गजानन महाजन, वसंत पाटील, रविंद्र पाटील, प्रभाकर चौधरी, राजेंद्र जैस्वाल, एस.बी. महाजन, ए.आर. पाटील, एल.डी. अंतुर्लीकर, जयंत कुलकर्णी, हेमेद्र नगरीया, एल.डी. निकम आदी मान्यवर उपस्थीत होते. मान्यवरांचा परीचय दिलीप वैद्य यांनी केला.