कुविख्यात तस्लीम काल्याची स्थानबद्धतेतून सुटका

0

भुसावळ: कुविख्यात तस्लीम काल्या (दिनदयाल नगर, भुसावळ) विरुद्ध बाजारपेठ पोलिसांनी एमपीडीए (स्थानबद्ध) चा प्रस्ताव सादर केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी त्यास मंजुरी दिल्यानंतर तस्लीम उर्फ काल्या शेख सलीम यास स्थानबद्ध करून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. स्थानबद्धतेच्या आदेशात कालावधी नसल्याची तांत्रिक बाब लक्षात घेत अ‍ॅड.आशिष सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या अ‍ॅडव्हायझरी (गृह विभागाचे सल्लागार मंडळ) बोर्डाचे न्या.नरेश पाटील तसेच माजी न्या.हरदा व न्या.पंडित यांच्या न्यायासनापुढे बाजू मांडल्यानंतर न्यायालयाने तस्लीमच्या मुक्ततेचे आदेश दिले. आदेश दिल्यानंतर नाशिकच्या मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने 18 नोव्हेंबर संबंधितास मुक्त केले असून गृह विभागाच्या कक्ष अधिकार्‍यांना त्याबाबत 21 नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे सूचित केले आहे.

खंडणीच्या गुन्ह्यात अटक
तस्लीम उर्फ काल्याची स्थानबद्धतेतून सुटका करण्यात आली असलीतरी त्यास बाजारपेठ पोलिसात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात मात्र अटक केल्यानंतर जळगावच्या सबजेलमध्ये ठेवण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.