भुसावळ: कुविख्यात आरोपी व गुन्हेगारी पार्श्व भूमीमुळे स्थानबद्ध करण्यात आलेल्या शे.तस्लीम उर्फ काल्या शे.सलीम (21, रा.दिनदयाल नगर, जामनेर रोड, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्यात जिल्हाधिकार्यांच्या परवानगीने अटक करीत न्यायालयापुढे हजर करून दोषारोपपत्र सादर करण्यात आले. आरोपी एमडीएमुळे एक वर्षांसाठी स्थानबद्ध असल्याने त्याची नाशिक सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली असल्याने त्यास न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी नाशिक कारागृहात हलवण्यात आली. आरोपीविरुद्ध भाग 5 गुरनं. 153/2017 भादवी 387,323,504,506 34 गुन्हा दाखल असल्यास त्यास अटक झाली होती. पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या यांच्या मार्गर्शनाखाली सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, विकास सातदिवे, प्रशांत चव्हाण यांनी ही कारवाई केली.