कुविख्यात तस्लीम काल्याला अटक, तलवारीच्या धाकावर मागितली खंडणी

0

भुसावळ : किराणा दुकानदारास तलवारीचा धाक दाखवत 70 हजारांची खंडणी मागणार्‍या कुविख्यात तस्लीम काल्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अटक केली. तक्रारदार परवीन जसपालदास आगीचा यांच्या दीनदयाल नगरातील किराणा दुकानात आरोपी तस्लीमने रविवारी सकाळी नऊ वाजता तलवारीचा धाक दाखवत 70 हजारांची मागणी केली. बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक निशीकांत जोशी, सुधीर विसपुते, वाल्मीक सोनवणे, दीपक पाटील, ईश्‍वर भालेराव, दीपक पाटील आदींनी आरोपीला अटक केली.