कुविख्यात सुरेश ठाकरे स्थानबद्ध

0
जिल्हाधिकार्‍यांचे आदेश ; नाशिक कारागृहात रवानगी
जळगाव :- कुविख्यात सुरेश पुंडलिक ठाकरे (कोळी पेठ, जळगाव) यास स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी काढल्यानंतर त्याची नाशिक कारागृहात रवानगी करण्या आली.
आरोपीविरुद्ध खुनासह, दरोडा, खंडणी, हाणामारी यासह विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी या संदर्भातील प्रस्ताव पाठवल्यानंतर कारवाई करण्यात आली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला नाशिक कारागृहात हलवण्यात आले.