कुवेतमध्ये भारतीयांना कुत्रे म्हणून हिणवले

0

नवी दिल्ली-प्रसिद्ध गायक अदनान सामी आणि त्याच्या सहकाऱ्यांना कुवेतमध्ये अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागले. कुवेत विमानतळावर माझ्या सहकाऱ्यांचा अपमान करण्यात आला असून त्यांना ‘भारतीय कुत्रे’ म्हणून हिणवल्याचा आरोप अदना सामी यांनी केला आहे. एका कार्यक्रमासाठी अदनान त्याच्या सहकाऱ्यांसोबत कुवेतला गेला होता. त्यावेळी ही घटना घडली. घडलेल्या प्रकाराबद्दल ट्विट करत त्याने संताप व्यक्त केला.

रविवारी रात्री अदनान आणि त्याचे सहकारी कुवेत विमानतळावर उतरले. काहीही कारण नसताना गैरवर्तन करत कुवेतमधील इमिग्रेशन अधिकाऱ्यांना त्यांना ‘भारतीय कुत्रे’ म्हणून हिणवलं. अदनान सामीने ट्विटरच्या माध्यमातून हा आरोप केला आहे.