कुशवाह यांनी राजीनामा दिल्याने कॉंग्रेसकडून अभिनंदन !

0

नवी दिल्ली- राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी आज नरेंद्र मोदी सरकारमधून मंत्री पदाचा राजीनामा देत एनडीएला सोडचिट्टी दिली. याबाबत कॉंग्रेसने कुशवाह यांचे अभिनंदन केले आहे. कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला याने ट्वीट करत कुशवाह यांचे अभिनंदन केले आहे.

निरंकुश सरकारची पोलखोल कुशवाह यांनी केली आहे. मोदी लोकशाहीसाठी घातक आहे अशी टीका देखील कॉंग्रेसने केली आहे.

उद्यापासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. त्यापूर्वी कुशवाह यांनी राजीनामा दिल्याने राजकीय गोट्यात खळबळ उडाली आहे.