कुश, हर्शिताला विजेतेपद!

0

मुंबई । मुंबई जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत बीकेसीच्या अमेरिकन इंटरनॅशनल स्कूलमधील कुश भगत आणि फोर्टच्या कॅथेड्रेल अ‍ॅण्ड जॉन कॉनन शाळेतील हर्शिता महेश्‍वरी या दोघांनी अंतिम फेरीत विजय मिळवला. ही स्पर्धा धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडली. मास्टर कुश आणि हर्शिता या दोघांनी 9 फेरीत अनुक्रमे 8.5 आणि 8 असे गुण मिळवले. यापूर्वी कुशने सात वर्षांखालील वर्ल्ड स्कूल ब्लीट्झ चेस चॅम्पियन आणि वेस्ट युथ चेस चॅम्पियनशिपमध्ये तीन वेळा सुवर्णपदक मिळवले आहे. कुश हा साउथ मुंबई चेस अकादमीत प्रशिक्षण घेत असून फिडे मास्टर बालाजी गुटुल्ला हे त्याचे प्रशिक्षक आहेत.

या स्पर्धेत अव्वल पाच स्पर्धक म्हणून 10 वर्षांखालील मुलांच्या गटात कुश भगत (8.5 गुण), कडाकिया वीर (8), आरव डेंगला (8), अर्नव लखानी, (7.5), शाह जयसाल (7), तर मुलींच्या गटात हर्शिता महेश्‍वरी (8), सराह पवार (7.5), गजरे प्रुथा (7.5), मृदुला साळुंखे (7.5), श्रेया मुखर्जी (7.5) या अव्वल ठरल्या.12 वर्षांखालील मुलांच्या गटात राहील मुल्लीक (9) आणि मुलींच्या गटात क्रिती पटेल (9) यांनी विजय साकारला. या खेळाडूंनीदेखील सुंदर खेळी करत प्रतिस्पर्ध्यांना हरवले.