कुसुंबामध्ये चोरट्यांनी बंद घर फोडून हजारांचा ऐवज लांबविला

0

जळगाव। कुसुंबा खुर्द गावातील प्राथमिक शाळेजवळ राहणार्‍या देशमुख कुटूंबियांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून 41 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना आज उघडकीस आली आहे. चोरट्यांनी एक एलईडी टिव्ही व 12 हजार रुपयांची रोकड लंपास केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

शेती कामासाठी गेले कंडारीला अन् चोरट्यांनी साधली संधी
योगेश गजाननराव देशमुख (वय-31) हे पत्नी दर्शना व मुलगा आरूष यांच्यासोबत कुसूंबा खुर्द येथील रायपुर प्राथमिक शाळेमागे राहतात. योगेश यांचे गोलाणी मार्केटमध्ये सुर्या कॉम्प्युटर हे दुकान असून 6 जानेवारी 2017 रोजी योगेश हे नेहमी प्रमाणे दुकनावर गेले. पत्नी दर्शना ह्या देखील माहेरी गेल्या असल्यामुळे सांयकाळी 6 वाजता देशमुख हे घरी आल्यानंतर बाहेर जेवणासाठी गेले. यानंतर रात्री 9.30 वाजता घरी आल्यावर घराला कुलूप लावून शेतीकामनिमित्त त्यांच्या मुळ गावी कंडारी येथे मोटारसायकलने निघून गेले. यानंतर रात्री कंडारी येथेच्या त्यांच्या जुन्या घरी थांबले.

7 जानेवारीला सकाळी 10 वाजता योगेश देशमुख हे कुसूंबासाठी निघाले. मात्र, घरी न जाता ते गोलाणी येथील त्यांच्या दुकानात गेले. दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांना पत्नी दर्शना यांचा फोन आला की घराचा मागचा दरवाजा उघडा आहे तर पुढच्या दाराचे कुलूप उघडे आहे. अशी माहिती शेजारी राहणार्‍या पुजा परदेशी यांनी मला सांगितल्याचे त्यांनी पत्नी योगेश देशमुख यांना पत्नीने सांगितले. यानंतर काही वेळातच योगेश यांनी कुसूंब्यातील घर गाठले.

कपाट फोडून 12 हजारांची रोकड चोरी
घराची पाहणी केली असता त्यांना दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडलेले दिसले. तर घरात प्रवेश केल्यानंतर 29 हजार रुपये किंमतीचा एलईडी चोरीला गेल्याचे लक्षात आले. तर चोरट्यांनी कपाट फोडून त्यातनी 12 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे त्यांना दिसून आले. तर कपाटातील सामान अस्ताव्यतस्त फेकलेले होता. चोरट्यांनी एकूण 41 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असून याप्रकरणी योगेश देशमुख यांनी आज 7 एप्रिल रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.