कुसुंब्याजवळील पुलाची दुर्दशा : विद्यार्थ्यांना करावी लागते कसरत

0

दुर्घटना घडल्यास प्रशासन जवाबदार : संतप्त ग्रामस्थांचा इशारा

कुसुंबा- कुसुंबे खुर्द व कुसुंबे बु.॥ या दोन्ही गावांमधील पाझर तलावाच्या नालयावरील नाल्यावरील लहान पुलाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. हा पूल केव्हाही कोसळून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने अप्रिय घटना घडल्यास त्यास प्रशासन व संबंधित विभागाची अधिकारी जवाबदार असतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत जाणार्‍या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा या पुलावरून नियमित वापर आहे. तुटलेल्या पुलामुळे चिमुकल्यांना तारेवरची कसरत करावी लागते. सद्यस्थितीत या पुलाजवळील नाल्यात पाणी नसल्याने शाळेत जाणार्‍या विद्यार्थांना ये-जा करण्यास सोपे आहे परंतु पांझर तलावाच्या नाल्याला अचानक पूर आल्यास पुलावरून जाणे धोक्याचे ठरू शकते. पूल तुटल्याने अतिशय जीर्ण झाला आहे. या पुलाबाबत दोन्ही गावच्या सरपंचांनी आमदार-खासदारांना वेळोवेळी निवेदने देऊन देखील काहीच उपयोग झाला नाही. पूल बांधणे तर सोडाच या दोन्ही गावाकडे आमदार-खासदारांनी पाठ फिरवली आहे.

दुर्घटना घडल्यास अधिकारीच जवाबदार
पावसाळ्यात सातपुडा पायथ्याशी असलेला पांझर तलाव लगेच ओव्हरफ्लो होवून नाल्याला पूर येतो. अशा स्थितीत या पुलावरून वापरणे धोक्याचे आहे. शाळेजवळील लहान पुलाजवळ काही दुर्घटना घडल्यास संबंधीत अधिकारी पदाधिकारीच जबाबदार राहतील, अशी संतप्त भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. पूल बांधावा, अशी मागणी ग्रामस्थांसह दैनिक जनशक्तिचे पत्रकार हमीद तडवी व रशीद तडवी यांनी या पत्रकाद्वारे केली आहे.