27 हजारांच्या रोकडसह दागिणे लांबविले ः एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव: कुसूंबा येथील सदगुरुनगरातील कमलेश सातपुते कुटूंबीयांसह इंदौर गेले असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून रोकडसह दागिने असा 69 हजार रुपयांचा ऐवज यात सोन्याचे मणी, सोन्याची पोत, अंगठ्या, इतर दागिने लंपास केल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
कुसूंबा येथील सदगुरु नगरात कमलेश रविंद्र सातपुते (वय-31) कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्याचे बंधु इंदौर येथे स्थायिक असून संपुर्ण कुटूंबीय 7 रोजी घर बंद करुन इंदौर येथे गेले होते. 17 रोजी सातपुते कुटूंबीय जळगावी सदगुरु नगरातील घरी परतले. घरी आल्यावर मुख्य दाराचा कडीकोयंडा तूटलेल्या अवस्थेत आढळून आला. आत गेल्यावर घरीातील साहीत्य अस्ताव्यस्थ फेकून लोखंडी कपाट तोडण्यात येवुन रोकडसह दागिने चोरट्यांनी लंपास केले. सातपुते यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
चोरीस गेलेला ऐवज
गेल्या दहा दिवसापासुन कमलेश सातपुते आणि कुटूंबीय बाहेर गावी गेले होते. काल कसुुंबा येथे नळाला पाणी आल्यानंतर शेजारी पंडीत शुक्ला, दामु पाटिल यांनी सातपुते यांच्या कंपाऊंड मधील नळाला मोटारलावून दुपारी पाणी भरले. तेव्हा घराचा दरवाजा व्यवस्थीत कुलूप बंद होता. रात्रीतून चोरट्यांनी घरफोडी केल्याचे शेजार्यांनी सांगीतले. घटनेत 6 ग्रॅम वजनाचे 6 हजारांचे सोन्याचे मणी, 20 ग्रॅम 24 हजारांची सोन्याची पोत, 10 ग्रॅम रुपये किंमतीच्या 12 हजारांच्या 2 अंगठ्या व 27 हजार रुपयांची रोकड