कुसूंबा खुर्द येथे वीज पडून एकाचा मृत्यू,दुसरा जखमी

0

जळगाव। तालुक्यातील कुुसूंबा खुर्द येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शिरपुर तालुक्यातील बोराडी जवळील खिले बोर्ड येथील रहिवाशी प्रकाश गुलाब पावरा (वय 38) हे रोजगारानिमीत्त जळगाव तालुक्यातील कुसूंबा खुर्द्र येथे कुटूंबियांसोबत सहा महिन्यापासुन आले होते.

सकाळी शौचालयास जात असतांना त्यांच्या अंगावर अचानक वीज पडली. यामुळे पावरा भाजले गेले. याचवेळी त्यांच्याजवळ असलेल्या खंडू सुकलाल पावरा (वय 35) त्यांच्या अंगावर देखील वीज पडली. प्रकाश पावरा यांचा जागीच मृत्यू झाला. तर खंडू पावरा गंभीररित्या भाजले गेले. दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. प्रकाश पावरा यांना वैद्यकिय अधिकारी डॉ.सुतार यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोहेकॉ.बाळकृष्ण पाटील करीत आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर कुवरसिंग गुलाब पावरा यांच्याकडे प्रकाश पावरा यांचा मृतदेह सोपविण्यात आला. यावेळी रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला.