कुसूंबा येथील शेतकर्‍याचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन

0

रावेर। तालुक्यातील कुसूंबा बु.॥ येथील एका शेतकर्‍याची गावालगतच्या 25 एकर क्षेत्रातील सुमारे दीड कि.मी.लांबीच्या रस्त्यासाठी अंदाजे एक हेक्टर शेती तब्बल 41 वषार्पुर्वी संपादित केली होती. भूसंपादनाच्या रकमेच्या अदायगीबाबत औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आदेश करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली नाही तसेच दिलेले आश्वासन न पाळल्याने संतप्त शेतकरी जयवंतराव शंकरराव जावळे यांनी गुरुवार 1 रोजी थेट रावेर – पाल रस्त्यावर ठिय्या मारुन रास्ता रोको आंदोलन केले.

शेतकरी संपातच या अन्यायग्रस्त शेतकर्‍याने आंदोलनाचे हत्यार उपसल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले असून एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान जोपर्यंत मागणीकडे लक्ष देऊन न्या मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याची भुमिका शेतकर्‍याने घेतली आहे.