कुसूमवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध समस्या

0

शहादा । तालुक्यातील कुसूमवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र विविध समस्यांनी ग्रासले असून त्या समस्या मार्गी लावाव्यात अन्यथा परिसरातील नागरीकांसह मनसेच्या वतीने आंदोलनाचा इशारा मनसेचे जिल्हा सचिव मनलेश जायसवाल यांनी मुख्य कार्यकारी अधिकार नंदुरबार यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या कुसूमवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुुविधेसोबत इमारतीची दुर्दशा तसेच अपुरे कर्मचारी वर्ग अशा एक ना अनेक समस्या आहेत.

मनसेच्या वतीने नगरपालिकेला निवेदन
या प्राथमिक आरोग्य केंद्रात परीसरातील 10 ते 15 पाड्यातील भुते आकसपूर, चिरडे नांदिया कन्साई नवागाव चिंचोरा मडकानी फत्तेपूर रामपूर कुढावद पिंपळोद औरंगपूर लाछोरा शिरूड उमर्टी आमोदा तलावडी पिंप्राणी वीरपूर दर जावदा चिखली कानडी कुसूमवाडा-कन्साई आदींचा समावेश येतो. 45 हजार लोकसंख्येसाठी असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध समस्या आहेत. संबंधितांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थ आरोग्य सुविधेपासून वंचीत आहेत. या आरोग्य केंद्रात लोकसंख्येच्या मानाने कर्मचारी वर्ग कमी आहे. सध्या एक वैद्यकिय अधिकारी, एक प्रयोगशाला तंत्रज्ञान, एक परिचारिका, एक कंत्राटी परिचारिका, दोन आरोग्य सेवक, दोन शिपाई एवढाच कर्मचारी वर्ग आहे.

अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे आरोग्य सुविधांच्या अडचणी
वास्तविक या ठिकाणी वैद्यकिय अधिकारी वर्ग 1, कंपाऊडर, लेखनिक, आरोग्यसेविका, आरोग्य सेवक, शिपाई, वाहनचालक आदिंची लोकसंख्येच्या तुलनेत नियुक्ती आवश्यक आहे. या केंद्रात वैद्यकिय अधिकारी ’अ‘ वर्ग पदरिक्त असून लेखनिक प्रतिनियुक्तिवर नाशिक आयुक्त कार्यालयात कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. अपूर्‍या कर्मचारींमळे आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. येथील आरोग्य केंद्रात कुटूंब नियोजन शस्ञक्रिया, कुपोषित बालकांवर उपचार, गरोदर मातांवर उपचार विविध साथीचे आजारावरील उपचारासाठी रूग्ण मोठ्या आशेने येतात. मात्र अपुर्‍या कर्मचारीमुळे रूगणांना उपचाराविना परतावे लागते.