कुस्तीपटू असलेल्या विद्यार्थ्याचे स्वीकारले पालकत्त्व

0

खाण क्रशर संघटनेने जपली सामाजिक बांधिलकी

तळेगाव दाभाडे : मावळ तालुका खाण क्रशर संघटनेने गरीब कुस्तीपटू असलेल्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक, कुस्तीसाठी पालकत्व स्वीकारल्याची माहिती संघाचे अध्यक्ष, तसेच रोटरी सिटीचे संस्थापक विलास काळोखे, संचालक किरण काकडे यांनी दिली. यावेळी काळोखे म्हणाले की, मावळ तालुक्यातील माळवाडी येथे राहणारा राहुल नंदकुमार जाधव, हा इयत्ता 10 वी मध्ये 75 टक्के गुण मिळवून पास झालेला विद्यार्थी आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या आईचे अकस्मात निधन झाले. तसेच त्याचे वडील मतिमंद आहेत. वडिलांचा औषधांचा खर्च आणि घर चालवण्यासाठी राहुल घरोघरी दूध वाटण्याचे काम करतो. त्यातुन त्याला महिन्याला शे-पाचशे रुपये मिळतात आणि याच पैशातून तो सर्व खर्च भागवण्याचा प्रयत्न करतो. परंतु यामध्ये त्याला शैक्षणिक खर्च परवडत नाही. त्यामुळे राहुलचे पुढील शिक्षण अपुरे राहू नये म्हणुन मावळ तालुका खाण क्रशर उद्योजक संघाच्या माध्यमातून अध्यक्ष विलास काळोखे व संचालक किरण काकडे यांच्यावतीने राहुलचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यात आले आहे. यावेळी मावळ तालुका खान क्रशर उद्योजक संघाचे अध्यक्ष तसेच रोटरी सिटीचे संस्थापक विलास काळोखे, संचालक किरण काकडे, अध्यक्ष नितीन शहा, सुरेश दाभाडे, संजय मेहता, बाळासाहेब रिकामे, बाळासाहेब भेगडे, अध्यक्ष केशव मोहोळ उपस्थित होते.