कुस्तीपटू बबिता फोगट भाजपात !

0

नवी दिल्ली: ऑलम्पिक विजेत्या कुस्तीपटू बबिता फोगट यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या भाजपात जाणार अशी चर्चा होती, अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मोदींच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बबिता फोगट यांनी सांगितले.

बबिता फोगत यांनी जागतिक स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या जीवनावर दंगल चित्रपट आला होता. अमीर खान यांच्या मुख्य भूमिकेत हा चित्रपट होता. या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये धमाल केली होती.