नवी दिल्ली: भारताचा ओलंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार डब्ल्यूडब्ल्यूईचा दुसरा रेसलर बनू शकतो. द ग्रेट खलीनंतर सुशील भारतीय रेसलर बनू शकतो. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डब्ल्यूडब्ल्यूईने याची ऑफर केली आहे. दरम्यान सुशील पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यात डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये पदार्पण करू शकतो. डब्ल्यूडब्ल्यूईसोबत याबाबत सुशीलची ऑक्टोबरमहिन्यापासून बोलणी चालू होती आणि डब्ल्यूडब्ल्यूईची ऑफर सुशीलने स्वीकारली असल्याचे वृत्त आहे. पण सुशीलकडून या बातमीला दुजोरा मिळालेला नाही.
याबाबत सुशीलकडून अद्यापही कुठल्याही प्रकारची माहिती न आल्याने सत्य काय आहे हे अजून समोर आलेले नाही. दोन ओलंपिकमध्ये सुशीलने भारताचे प्रतिनिधित्व केले असून डब्ल्यूडब्ल्यूईने ऑक्टोबरमध्येच सुशीलला ही ऑफर दिली होती. त्यानंतर सुशीलने यावर गंभीरतेने विचार केला नव्हता पण आता तो या सहभागी होण्यासाठी तयार झाला आहे. दरम्यान सुशीलशी डब्ल्यूडब्ल्यूईची ऑफर मानधनामुळे थांबली होती.