हरियाणा : कॉंट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत काहीना काही कारणांमुळे नेहमीच चर्चेतस्ते. हरियाणात झालेल्या रेसलींग स्पर्धेत तिने आपला सहभाग नोंदविला होता. मात्र, या खेळात राखीला दुखापत झाल्याने तिला थेट रुग्णालय पाळावे लागले.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हरियाणातील पंचकुला येथे कॉन्टिनेंटल रेसलींग इंटरनॅशनल (सीडब्ल्यूई) बॅनरखाली रेसलिंगच्या बिग फाईटचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विदेशी महिलेने राखीला चांगलाच दणका दिला. राखीने विजयी महिला कुस्तीपटूला आव्हान करत तिच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला होता.
जमिनीवर जोरात आपटल्यामुळे राखीच्या पाठीत आणि पोटात असह्य वेदना होऊ लागल्या त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं.