कृउबाच्या गाळ्याचे भूमिपूजन

0

अमळनेर। ये येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धुळे रोड लगत असलेल्या दुकानाच्या मागील जागेत नवीन गाळयाचे भूमिपूजन आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समिती सभापती उदय भिकनराव वाघ हे होते. गाळयांचे भूमिपूजननंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक संचालक उदय नंदकिशोर पाटील यांनी केले. चांगल्या कामांचे चांगल्या दिवशी चांगल्या लोकांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. सुमारे 1 ते 100 गाळे जे धुळे रोडला लागून व्यापारी संकुल आहे, त्याच्या मागील बाजूस ही दुकाने बांधली जाणार आहेत. या दुकानांसाठी व्यापारी, दुकानदार, बेरोजकार यांची मागणी होती. त्या अनुशंगाने संचालक मंडळाने निर्णय घेवून पणन मंडळाची परवानगी घेवून हे काम सुरु केले. यापासुन उत्पन्नात वाढ होणार असून यापुढे देखील संचालक मंडळ प्रयत्नशील राहील असे सांगितले. आमदार स्मिता वाघ यांनी सांगितले की, अमळनेर बाजार समिती जिल्ह्यात एक नंबर व्हावी व चौफेर गाळे व्हावित यासाठी प्रयत्नशील राहू, असे सांगितले.

यांची होती उपस्थिती: उप सभापती अनिल पाटील, पं.स.सभापती वजाबाई भील, संचालक प्रफुल्ल पवार, हरि वाणी, पावबा पाटील, सुरेश पाटील, भगवान कोळी, विश्वास पाटील, मंगलाताई पाटील, भटा पाटील, श्याम अहिरे, भाजपा ता.अध्यक्ष बाळासाहेब पाटील, पं.स.सदस्या कविता पाटील, रेखाबाई पाटील, महेश देशमुख, पदमाकर गोसावी, कामराज पाटील, अड़. श्रावण सदा ब्रम्हे, संदीप पाटील, गणेश पाटील, मिलिंद पाटील, भिका पाटील, संजय पाटील, दिपक पाटील, शितल देशमुख, सुरेश पाटील, श्रीनिवास मोरे, नाटेश्वर पाटील, पंकज चौधरी, राजेश वाघ आदी उपस्थित होते.

शेतकर्‍यांसाठी मुलभूत सुविधा मिळणार
उदय वाघ म्हणाले की, बाजार समितीचा खरा विकास सुरु झाला असून छोट्या मोठ्या संस्थाची वाइट परिस्थिती निर्माण झाली होती.व बाजार समिती लोप पावली जावू नये व बाजार समिती शेतकर्‍यांची मानबिंदु असलेली संस्था आहे ती वाढली पाहिजे,विकास झाला पाहिजे हा विचार संचालकानी केला आहे.ह्या वर्षी विक्रमी आवक बाजार समितीत यावल, भुसावळ, एरडोल, भडगांव, पाचोरा, धरणगाव, चोपडा, धुळे, शिंदखेडा, शिरपुर आदी तालुक्यातुन येत असून मका, हरबरा याची विक्रमी आवक सुरु आहे गुढीपडवाच्या एक दिवस अगोदर 30 हजार क्विंटल च्या वर आवक होती. पूर्वी 100 कोटीचा टनओहर होता आता 500 ते 550 कोटी चा उच्चाक गाठला आहे. येथील कर्मचारी वर्ग बँकेच्या अडचणी असो अथवा कुठलीही अडचन असो ते सोडतात. भविष्यात पिण्यासाठी आरओ सिस्टीम बसविले जाईल व संपूर्ण बाजार समितीत कॉन्क्रीटीकरण करणार आहोत शेतकर्‍यांच्या मालाची प्रत आखता येईल उत्पन्न वाढीसाठी तापी महामंडळ चे कार्यालय ह्या ठिकाणी देत असून त्या पासून देखील भाडे मिळणार आहे.

एकत्र येवून पारदर्शकता दाखवा
आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले की बाजार समितीत सर्व गट विकासासाठी एकत्र आलो कारण बाजार समितीत पारदर्शकता आली पाहिजे व आता बाजार समितीचे नाव गौरवाने घेतले जाते.पूर्वी बाजार समिती अड्डा बनली होती.आता बाजार समितीचे नाव लौकिक झाले पाहिजे विकासाचे कोणती कामे पाहिजेत ते सांगितले व आम्ही दोघी आमदारानी पाठपुरावा केला व व्यापारी, बेरोजगार, यांना पूरक गाळे मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहोत विक्रमी आवक असली तरी हमाल, मापाडी, व्यापारी, कर्मचारी खरेदी करून रोखिने पेमेंट देतात ही बाब कौतुकाची आहे. 376 गट न साठी प्रयत्न करू व अमळनेर तालुक्याचा विकासकामचे कार्य हाती घेतले आहे.