मनपा वृक्ष प्राधिकरणच्या सभेत ठराव मंजूर
जळगाव- मनपाची परवानगी न घेता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील 125 वृक्ष तोडण्यात आलेे होते.त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड करण्याचा ठराव महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला.
मनपाा वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक आज झाली. यावेळी उपायुक्त उत्कर्ष गुट्टे , नगरसेवक नितिन बरडे, प्रशांत नाईक, डॉ.चंद्रशेखर पाटील, प्रविण कोल्हे, किशोर बा विस्कर, रंजना सोनार यांच्यासह शहर अभियंता सुनिल भोळे,सुशील साळुंखे, एस.एस.पाटील,उदय पाटील, विलास सोनवणी उपस्थित होते. यावेळी 23 प्रस्ताव मंजूर क रण्यात आले.
125 झाडे तोडली होती
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात विना परवानगीने 125 झाडे तोडल्याची तक्रार शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार पंचनामा करण्यात आला होता. याबाबत वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत चर्चा झाली. तसेच परवानगी न घेता वृक्ष तोडणार्या कृषी उत्पन्न समितीला प्रति झाड 10 हजार रुपये प्रमाणे 12 लाख 50 हजार रुपये दंड करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. कृषी उत्पन्न समितीने बांधकामासाठी पुन्हा 37 झाडे तोडण्याची परवानगी मा गितली आहे. त्यावर जी झाडे अडथळा ठरत असतील तिच झाडे तोडण्याबाबत निश्चित करुन तोडलेल्या प्रत्येक झाडापोटी पाच झाडे लावण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
महामार्गावरील झाडे तोडण्याचा ठराव
जळगाव शहरातून जाणारा महामार्ग चौपदरीकरणासह विस्ताराचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळेे महामार्गाच्या दुतर्फा असणारी झाडे तोडण्यासाठी महामार्ग प्राधिक रणानने महापालिकेला परवानगी मागितली आहे. हा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला आहे.