कृउबा समितीच्या आवारात भाजीपाला, शेतीमालाचा लिलाव

0

शहादा। बाजार समिती ही नेहमी शेतकरी हिताचा विचार करणारी समिती आहे. स्व पी.के. पाटील यांच्या प्रेरणने दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समिती कार्य करत असुन नेहमी शेतकर्‍यांच्या शेतमालास जास्त भाव मिळावा म्हणून समिती प्रयत्नशील राहते. त्याच अनुषंगाने बाजार समितीत फळे व भाजीपाला लिलावाद्वारे विकला जावा म्हणून बाजार समितीचे प्रयत्न सुरु आहेत. या आधारावर तालुक्यातील विविध शेतकरी संघटना सुध्दा प्रयत्नशील होत्या या संदर्भत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकही आयोजित करण्यात आली होती.

प्रत्यक्ष भाजीपाला लिलाव मार्केट यार्डवर सुरू करणार
जिल्हाधिकारी याने एक कमिटी गठीत केली होती. यात जिल्हा उपनिबंधक, कृषी अधिकारी, सभापती कृषीउत्पन्न बाजात समिती, व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष घनश्याम चौधरी यांचा समावेश करण्यात आला होता. यानुसार यासमितीची बैठक नुकतीच झाली असुन बाजार समितीतच शेतकर्‍यांना न्याय मिळु शकतो. फळे व भाजीपालाचे लिलाव बाजार समितीतच व्हावा असे ठरविण्यात आले. परिसरात उत्पादित शेतकरी बांधवांच्या भाजीपाला या शेतीमालाचा लिलाव बाजार समितीचा आवारात सुरु करण्यात येणार आहे. परिसरातील भाजीपाला खरेदी विक्रीसाठी इछुक असणार्‍या व्यक्ती किंवा सहकारीसंस्था यांना आवाहन करण्यात येत आहे की यांनी समितीकडे भाजीपाला लिलावासाठी लागणारे जनरल कमीशन एजंट, अ वर्ग व्यापारासाठी अनुंद्यप्ती मिळणे करिता लेखी अर्ज 25 ऑगस्टपर्यंत सादर करावेत. योग्य ती कार्यवाही झाल्यानंतर प्रत्यक्ष भाजीपाला लिलाव मार्केट यार्डवर सुरु करण्यात येईल अशी माहिती सभापती सुनिल पाटील यानी पत्रकान्वये दिली.