नवापुर । नवापुर कृर्षी उत्पन्न बाजार समितीने आज त्यांचा हद्दीतील अतिक्रमण जे.सी.बी द्वारे काढण्यात आले. मागच्या वर्षापासून त्यांना नोटीसा देऊन व त्यांचा सभा घेऊन सुध्दा अतिक्रमण काढत नव्हते. शेवटी कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल पिंपळे यांनी पोलिस फाटा बोलावुन अस्थाई अतिक्रमण काढण्यात आले. कृषी उपन्न बाजार समितीची साडे पाच एकर जमिन शहराच्या मध्यभागी आहे. याठिकाणी काही लोकांनी लहान मोठे शेड, झोपडया करुन अनेक वर्षांपासून वास्तव केले होते.
काहींनी तर दुकांनेपण सुरु केलीे होती. बाजार समितीने त्यांचा वेळो वेळी मज्जाव करुन ही ते अतिक्रमण काढत नव्हते. उलट दिवसेन दिवस वाढत होते. हे सर्व पाहता सवता कृर्षी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिपक नाईक, सचिव अमोल पिंपळे यांनी स्वतः उभे राहुन हे अतिक्रमण काढुन घेतले. यामुळे बाजार समितीचा आवाराने मोकळा श्वास घेतला आहे.