जळगाव। जळगाव शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरुन रोज अपघात होत असून परंतु मागील काही दिवसापासून हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग झाला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत समांतर रस्त्यांच्या कामाला गती मिळत नसल्याने हा महामार्ग नसुन स्वर्गात घेऊन जाणार मार्ग संबोधण्यात यावे, असे जळगावकरांचे मत झाले असल्याचे यावेळी कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले. नेहमी होत असलेल्या अपघातात निष्पाप बळी जात असतात. सुस्त झालेल्या प्रशासनाला आंदोलन करीत असल्याने आता तरी जाग येऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी रस्ते कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. जळगावकर नागरिकांनी चळवळ म्हणून सहभागी होण्याची गरज असल्याचे कृती समितीकडून सांगण्यात आले आहे.
अजून किती निष्पाप बळी घेणार ?
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे राहुल खंडारे यांचे अपघातात निधन झाल्याने आज स्वयंफुर्तीने जळगाव समारंत रस्ते कृती समितीमार्फत राष्ट्रीय महामार्ग शेजारी डॉ. अग्रवाल हॉस्पीटल चौक येथे ’तिर्डी’ सजवून आता कोणाचा नंबर म्हणून समिती सदस्य हातात बोर्डे घेऊन वाट पाहत होते परंतु सुदैवाने आज अपघात होऊन कोणी मृत्यूमुखी पडला नाही. महामार्गाने अनेक बळी घेतले आणि त्याला दोषी प्रशासन असल्याचे कृती समितीने म्हटले आहे. आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या मुलगा आदर्श यांचा देखील मृत्यू महार्गावरील खड्ड्यानेच झाला होता. आज त्या घटनेला दोन वर्ष पूर्ण होत असून मात्र महार्गाची परिस्थिती जैसी थे आहे.
आंदोलनात यांचा होता सहभाग
तिरडी आंदोलनात अनंत जोशी, फारुख शेख, अमर जैन, विनोद देशमुख, गजानन मालपुरे, विराज कावडिया, अमीत जगताप, कैलास सोनवणे, अमोल कोल्हे, पियुष पाटील, भूणष सोनवणे, विवेक पाटील, कु. श्वेता कोळी, वैशाली पाटील, प्रवीण ठाकरे, समीर शेख, बंटी नेरपगारे, मितेश भदाणे, नवल गोपाल, प्रमोद वाणी, जे.पी. वानखेडे, जिनल श्रीश्रीमाळ, कल्पेश पाटील, जयेश पवार, तेजस दुसाने, दिपक धंजे, शंतनु नारखेडे, विनोन सैनी, अभिषेक ठाकरे, सुहास राठौड, रवि अपसारा, विवेक चौधरी, तेजस राजपुत, नयना गाजरे, जयेश भावसार, सत्यम साहु, नयन खडके, चेतन आटाळे, हर्षल राजपूत, सुदर्शन निकम, अजय पाटील, सहजन राजपूत व सुहास राठोड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.