कृत्रिम पाणी टंचाईने विद्यार्थी त्रस्त

0

दिव्यांग विद्यार्थींनींनाही आणावे लागते डोक्यावर पाणी ; जुलै महिन्यापासून पाणीपुरवठा बंद

सुविधा न दिल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा

शहादा । आदिवासी विद्यार्थ्यांना समाजच्या मुख्य प्रवाहात आणाण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र, या योजनांचा लाभ आदिवासी विद्यार्थ्यांना मिळत नसल्याची तक्रार मनसेतर्फे प्रकल्प अधिकार्‍याां निवेदनाद्वारे करण्यात आली. याप्रसंगी मनसेचे सचिव मनलेश जायसवाल, शहादा शहर उपप्रमुख कौस्तूभ मोरे, साधना पवार, पुजा मोरे, प्रगती पवार, अमिरा जांगळे आदी उपस्थित होते.शहादा तालुक्यातील मोहिदे येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह विविध समस्यांच्या विळख्यात आहे. या वसतीगृहाला मनसे पदाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेट देवून विद्यार्थ्यांच्या समस्यां जाणून घेतल्या. यात त्यांना पिण्याच्या व वापराच्यापाण्याबाबतची गंभीर समस्या असल्याचे समोर आले आहे.

विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
या वस्तीगृहात सुमारे १२५ विद्यार्थ्यांची राहण्याची व भोजनाची सोय करण्यात आली आहे. या वस्तीगृह हे तीन मजली इमारतीचे आहे. तळमजल्यावर अधिक्षक व कर्मचार्‍यांसाठी कार्यालय आहे. तर दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावर मुली राहतात. येथे विंधनविहीरीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र तांत्रिक कारणांमुळे मागील जुलै महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद आहे. पाण्यासाठी विद्यार्थ्यांना शेतशिवारातून सुमारे ४०० मीटर अंतरावरील चॉकलेटच्या कारखान्यातून बादली डोक्यावर ठेवून आणावे लागते. हे पाणी दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावर द्यार्थ्यीनींना न्यावे लागत आहे. तसेच इ.९ वीची विद्यार्थींनी करिना शिवराज चव्हाण ही दिव्यांग असून तिलाही पाणी आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मुबलक पाणी नसल्याने शौंचालयाचा वापर विद्यार्थी करीत नाही. त्यांना उघड्यावर शौंचास जावे लागत आहे. बाहेरून आणलेल्या या पाण्यामुळे आरोग्यास धोकाही निर्माण झाला आहे.

शासनाच्या उद्देशाला हरताळ
शासन हगणदारीमुक्त शहर, गाव योजना राबवत असतांना कृत्रीम पाणी टंचाईमुळे विद्यार्थींनांना उघड्यावर शौंचास जावे लागत आहे. वसतीगृहात पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असतांना पाणी आणण्याचे काम विद्यार्थ्यांना करावे लागत आहे. प्रशासन याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. अधिकार्‍यांना दिव्यांग विद्यार्थींंना पाणी आणावे लागत आहे याची खंत देखील वाटत नाही.

विद्यार्थी देतात अडचणींना तोंड
वसतीगृहातील विद्यार्थी विविध समस्यांना तोंड देतांना त्यांच्यात शिक्षणाविषयी तळमळ असल्यानेच ते वसतीगृहात अडचणी असतांना राहत आहेत. तरी या आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहण्यासाठी मुलभूत सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. मनसे पदाधिकार्‍यांनी वस्तीगृहाला भेट देवून वस्तूस्थिती जाणून विद्यार्थ्यीनींच्या सोयी सुविधेसाठी उपाययोजना करण्यात यावेत नाही तर महाराष्ट नवनिर्माण सेनेला सनदशीर मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्र्यांसह आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, पालकमंत्री जयकुमारा रावल, आदिवासी आयुे नाशिक आदिंसह संबंधी विभागांना देण्यात आले आहेत.