शिरपूर : जागतिक स्तरावर वैद्यकिय व फार्मसी तसेच अनेक क्षेत्रांमध्ये क्रांती होत असूतांना अशा विविध क्षेत्रांमध्ये आर्टीफिशिअल इंटेलिजेन्स (कृत्रिम बौद्धिमत्ता) सक्रीयतेने उपयोगात आणणे काळाची गरज आहे. आपल्या ज्ञानाचा वापर देशाच्या भल्यासाठी करणे अत्यावश्यक झाले आहे. आपल्याला असलेल्या ज्ञानाचा कोणीही अहंकार न बाळगता गुरु व शिष्याने सोबत ज्ञानाचे व विचारांचे देवाणघेवाण करणे गरजेचे आहे. आपल्याकडे असलेले स्कील योग्य रीतीने उपयोगात आणावे असे आवाहन भारत फार्मसी कौन्सिलचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.शैलेंद्र सराफ यांनी केले. आरोग्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर (आर्टीफिशिअल इंटेलिजेन्स इन हेल्थ केअर) या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेस प्रारंभ झाला. एस.व्ही.के.एम. संस्थेच्या मुंबई व शिरपूर येथील फार्मसी व एन.एम.आय.एम.एस. चे इंजिनिअरींग महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेस शास्त्रज्ञ, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, राष्ट्रीय शिक्षण संस्था तसेच उद्योग व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्तिंची व्याख्याने सुरु आहेत. देशभरातून फार्मा व इंजिनिअरींग क्षेत्रातील व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रातील सुमारे ३५० पेक्षा जास्त मान्यवरांची उपस्थिती आहे.
न्यूजलेटर-३ विशेष अंकाचे प्रकाशन
या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नवी दिल्ली येथील भारत फार्मसी कौन्सिलचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.शैलेंद्र सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे मॅनेजिंग कमिटी मेंबर राजगोपाल भंडारी, एन.एम.आय.एम.एस. प्रो-व्हाईस चान्सलर (प्र-कुलगुरु) डॉ.शरद म्हैसकर, मुंबई अधिष्ठाता डॉ.बाला प्रभाकर, शिरपूर कॅम्पसचे डायरेक्टर डॉ.आर.एस.गौड, शिरपूर कॅम्पसचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.अश्विनी देशपांडे, सहयोगी अधिष्ठाता अकिल बंगलोवाला आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते न्यूजलेटर-३ विशेष अंकाचे प्रकाशन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेच्या शोधनिबंधांसह एनएमआयएमएस अभिमत विद्यापीठाच्या सीडीचे अनावरण करण्यात आले.
अनेक विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन
कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टीफिशिअल इंटेलिजेन्स) संबंधीत अनेक विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी दि.२७ रोजी डॉ.नरेंद्र गोरे (आय.बी.एम. यु.एस.ए.) यांनी हेल्थ केअर क्षेत्रात ब्लॉक चेन्सचे वापर या विषयावर सविस्तर विवेचन केले. तसेच डॉ.विजयकुमार (मिसूरी विद्यापीठ, अमेरिका) यांनी इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड मॅनेजमेंटबाबत मार्गदर्शन केले.शास्त्रज्ञ डॉ.बालाजी गणेशन (ससेक्स सुनिव्हर्सीटी, यु.के.) यांनी रेडीऑनिक्स, डाटा मायनिंग अॅण्ड डीप लर्निंग अॅज पार्ट ऑफ आर्टीफिशिअल इंटेलिजेन्स (क्वालिफिकेशन ऑफ अॅन इमेजिंग बायोमार्कर) याबाबत तर डॉ.पी.के.चांदे (कॉम्प्युटर सल्लागार, इंदूर) यांनी इफिकशी ऑफ आर्टीफिशिअल इंटेलिजेन्स इन हेल्थ केअर यावर, डॉ.पराग कुलकर्णी (वरीष्ठ शास्त्रज्ञ, इक्नोलेशन, पुणे) यांनी बिल्डींग मशिन लर्निंग बेसड् प्रॉडक्टस्, प्रा.नरेंद्र चौधरी (डायरेक्टर, व्ही.एन.आय.टी., नागपूर) यांनी लँग्वेज स्ट्रक्चर युजिंग फज्जी सिमिलॅरीटी यावर व्याख्यानातून सविस्तर विवेचन केले. यावेळी प्राचार्य डॉ.एस.जे.सुराणा, प्राचार्य डॉ.एस.बी.बारी, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न
डॉ.बाला प्रभाकर म्हणाल्या की, आरोग्य क्षेत्रात निदान व उपचाराच्या अनेक पद्धतीत व रोबोट टेकनिक, डिजीटलायझेशन अशा अनेक बाबतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे जगभरात सुरु असल्याची बाब आनंददायी असून त्याचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार होऊन अंगिकारणे महत्वाचे आहे. डॉ.आर.एस.गौड म्हणाले की, संस्थेचे अध्यक्ष आ.अमरिशभाई पटेल व सह-अध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या दूरदृष्टीमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न सुरु आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जगाच्या पाठीवर सुरु असलेल्या सर्व सोयीसुविधा देण्यासाठी संस्था नेहमीच अग्रेसर असते. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान समोर यावे हा उद्देश सफल झाला आहे.
आजही होणार मान्यवरांची व्याख्याने
कार्यक्रमाचे आयोजन आमदार अमरिशभाई पटेल, भुपेशभाई पटेल, राजगोपाल भंडारी, डॉ.आर.एस.गौड, राहुल दंदे, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांनी केले. प्रास्ताविक डॉ.आर.एस.गौड यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.सरीता शेट्टी व प्रा.डॉ.पायल दंदे यांनी केले. आभार सहयोगी अधिष्ठाता डॉ.अश्विनी देशपांडे यांनी मानले.२८ रोजी डॉ.टॉम (वर्हेल्स्ट यूसीबी, ब्रिटन), डॉ.अंजली जयशंकर युनिव्हर्सीटी, ऑस्ट्रलिया), डॉ.पार्थ डे (आय.बी.एम., गुरगाव), डॉ.संतोष बोठे (पुणे), डॉ.प्रशांत बनसोड (इंदूर), डॉ.शुभांगी (नागपूर) यांच्यासह अनेक तज्ञ मार्गदर्शक बिजभाषणातून विशेष मार्गदर्शन करणार आहेत.