कृत्रीम गुडघे बदल शस्त्रक्रियेपुर्वी सल्ला आवश्यक

0

जळगाव । आजच्या जाहिरातीच्या जमान्यात रुग्ण मार्केटींगच्या जाळ्यात फसून चुकीचा निर्णयाचा अनेकदा बळी पडतो. आपणास सांगितलेली शस्त्रक्रिया गरजेची आहे काय? याला दुसरा पर्याय उपलब्ध आहे का? या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याकरीत अनुभवी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नाशिक येथील वोक्हार्ट हॉस्पिटल प्रख्यात सांधेबदल शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. योगेश चौधरी यांनी केले. ज्येष्ठ नागरिक संघ चैतन्यनगर जळगाव, भवरलाल कांताबाई जैन मल्टिपर्पज फाऊंडेशन, बहिणाबाई ज्येष्ठ महिला संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गुडघेदुखीवर आधारीत ‘जीना ईसी का नाम है’ या कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे डॉ. चौधरी म्हणाले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी दलुभाई जैन, सामाजिक कार्यकर्ते गजानन मालपुरे, महाराष्ट्र फेस्कॉमचे अध्यक्ष डी.टी.चौधरी, संघाच्या अध्यक्ष आशाताई तळेले, उपाध्यक्ष पंडीतराव सोनार, सचिव अ‍ॅड. अरूण धांडे, रजनी महाजन, डॉ. के.के.भोळे आदी उपस्थित होते.